माझी देवाची संकल्पना
काही वेळा मला न खूप च गम्मत वाटते हा काही लोकांची म्हणजे बघा आपल्या मान्युषा वर्गात दोन देवाशी जोडले गेलेले एकूण दोन वर्ग आहेत एक म्हणजे आस्तिक जे प्रेमाने, आपुलकीने देवाचा नाव घेत राहतात आणि कर्म करत राहतात तर दुसरे आहेत नास्तिक जे नेहमी शिव्या घालून पुन्हा पुन्हा त्यांचा च नकळत देवाचा नाव घेत राहतात.... मला त्यांचीच गम्मत वाटते आणि कीव हि येते... कारण त्यांना आस्तिक लोकं मूर्ख वाटत असतात. आणि कीव का वाटते ते हि सांगते पण आधी माझी देवाबद्दल ची संकल्पना सांगते.
मी काय किवा कोणी दुसरे काय प्रत्यक्षात देवाला कोणी हि पाहिलेला नाही.. मग आपण कसा बरं म्हणणार कि देव आहे म्हणून? तर मला सांगा तुम्हाला जा वारा लागतो तो तरी तुम्ही पहिला आहे का? तुम्ही जो श्वास घेता तो तरी तुम्हाला दिसतो का? अशा बऱ्याच न दिसणाऱ्या गोष्टींवर आपण न बघून सुद्धा विश्वास ठेवतो मग देवावर का नाही. ह्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण जरी पहिल्या नाही तरी अनुभवत असतो.. तसा देवाला अनुभवायला सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्या आजू बाजूला असतात पण हे नास्तिक वर्गात मोडणारी लोकं त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतात आणि त्याला देतात science च नाव... आणि फक्त नास्तिक नाही हा आस्तिक लोकं हि आजूबाजूला देव बरायचं रूपांनी मदत करायला येतो पण ह्या आस्तिक लोकांच्या डोळ्यावर सुद्धा झापड असतात ते सुद्धा त्या देवाला ओळखू शकत नाहीत.. स्वताचे स्वभाव दोष बघायचे सोडून देवाला दोष द्याच काम regular basis वर सुरु असता.
आता बघा रोज सकाळी ठरलेल्या वेळेवर पाहते सूर्योदय होतो त्याचप्रमाणे ठरलेल्या वेळेवर सूर्यास्त होतो. वारा वाहतो, पाऊस पडतो, बिजारोपणाने झाड उगवत, आई च्या पोटातून बाळ जन्माला येत, ९ महिने ते आई च्या पोटात तयार होता.. दिवसाला अनेक जण आई च्या कुशीत जन्माला येतात तसाच अनेक जण मृतुच्या कुशीत विसावतात.. हा सर्व हिशोब ठेवणारी कोणीतरी शक्ती हि नक्कीच असणार भले ती मूर्त स्वरुपात नसणार (म्हणजे जसा गणपती, देवी असं मूर्त नाही) ती अमूर्त असणार पण मानवाची वृत्ती आधीपासून अशीच आहे कि काही विलोभनीय पहिला कीच त्याचा मन त्यावर जडता म्हणून त्या अमूर्त स्वरूपाला मूर्त स्वरूप देण्यात आला आहे. जी लोकं आस्तिक आहेत त्यांना संकट आली, उदास वाटल जेव्हा कोणीही आपला नाही असं वाटत त्यावेळी मन मोकळ करायला, आधार मागायला त्यांचाजवळ देव असतो.. ते त्या ईश्वरासमोर नतमस्तक असतात त्यांचा मनाला नेहमी जाणीव असते कि आपल्यापेक्षा कोणती तरी मोठी शक्ती ह्या जगात आहे जी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे.. त्यामुळे ती व्यक्ती चांगलेच कर्म करते.. किवा खराब हि कर्म केलीत तरी नंतर पश्चाताप होऊन केलेली चूक भरून काढायसाठी चांगली कर्म करण्याची त्यांची तयारी असते.. हाच देव दुख्हात त्या व्यक्तीचा आधार बनतो.. हाच देव सुखात त्या व्यक्तीचा सखा बनतो.. हाच देव संकटात त्या व्यक्तीचा आत्मविश्वास बनतो.. आणि ह्याच सर्व गोष्टीना नास्तिक वर्ग मुकलेला असतो म्हणून मला त्यांची कीव येते...
क्रमश
No comments:
Post a Comment