आज दिवाळी चाच पण लक्ष्मीपूजना नन्तर चा दिवस म्हणजे आज तसा काही नाही सण नॉर्मल आपली दिवाळी आहे छान.... आज आमच्या office मध्ये खास पूजा आहे दिवाळी ची माझ्या एका मैत्रिणीचा तब्येत जरा नीट नव्हती.... तरी ती आली होती आम्ही सगळे बसून छान फुलांच्या पाकळ्या वेगवेगळ्या करत होतो..
तेव्हा बोलता बोलता ती बोलली कि आग काळ खूप वाद झाला घरात खर तर आज यायला जमणार होत कि नाही काही कल्पनाच नव्हती.. आम्ही उत्सुकतेने विचारला कि का ग काय झाला? त्यावर तिने सांगितला काल मी रात्री जेवली नाही तशीच झोपली आधी medicine सुरु त्यात हि भुकेली झोपली...आम्ही बोलली आग पण का झाला तरी काय... ती बोलली अग सगळ्यांचा म्हणन होत कि बर नाही आहे तर नको जाउस ऑफिस ला पण मला यायचा होत... कारण हे प्रसंग काही पुन्हा पुन्हा नाही येत... आणि आज काही लक्ष्मी पूजन हि नाही आहे... पण त्यांचा म्हणन असा कि आज जाणार मग तू थकणार मग उद्या कसा होणार एवढ सगळ उद्याची तयारी कोण करणार हि बोलली ते सगळ मी करायला तयार आहे ती जबाबदारी माझी.. मी करेन... पण सगळयांची तोंड उतरलेलीच होती..
तिचा ऐकला आणि तिचा वर वर आनन्दी अनि आत दुखावालेला मन पाहुन मि बोलली अग् मग नाही ययचा होतस न एक दिवस.. त्यवर ति बोलली कि " अग पण मला याचा होत न रोज असता का असा आपल्या इथे ऑफिस मध्ये... काही नाही हे लग्नंतर असाच असत प्रत्येक ठिकाणी मन मारायचा..."
ऐकून खूप विटे वाटल पण काय तिला समजवणार मी सुधा.. कारण ती जे काही बोलली ती काही चूक नव्हताच... बरोबर च होत..... जर ह्याच ठिकाणी तिच्या घरचे बोलले असते कि बर तुला जायचा आहे न तू जा... काही काळजी करू नकोस आम्ही सगळे तुला मदत करू उद्या सगळ नीट होणार.... पण हे तिच्या काय आणि कोणाच्याही घरात बोलाल जात नाही... आज आपला समाज सुधारला आहे सुधारा आहे बोलतो फक्त पण मुळात काही हि नाही..... सुधारणेच्या नावाखाली... सर्व काही रीतसर सुरु आहे.... जी मुलगी नव्या घरातून तुमच्या घरात आली आहे... तिला तुम्ही समजा... तिचा हि जीव आहे तिची हि स्वप्ना आहेत... तिच्या हि इच्छा आहेत हे लक्षात घेऊन प्रत्येक जन जर चालला तर किती बर होईल सगळे त्रास च संपणार...
पण मुळात असा विचार कोणी हि करत नाही .. काय अपेक्षा असतात तिच्या... हे कोणी जनात नाही... तिला एकच हवा असता... तो म्हणजे आधार... आधार प्रीतीचा.. प्रेमाचा... आपुलकीचा... बाकी काही नाही तो मिळाला
तर तुमच्यावर जीव हि ओवाळून टाकायला तयार असते ती...
.
आज ती नोकरी हि करते ते करताना कधी घाई असली तर तुमच्या छोटीशी मदतीची अपेक्षा असते तिला... ती हि छोटीशी .... अति नाही...
तिच्या महिन्यातल्या अडचणीच्या दिवसात जेव्हा ती मानसिक रित्या जरा भाउक असते तेव्हा थोडा समजूतदार पण हवा असतो तिला....
नवरा असेल तर त्याने थोडा एकांतात वेळ द्यावा आपल्यासोबत फिरावं वाटत तिला....
घराबाहेर असली... ऑफिस ला असली तर दिवसातून एकदा phone करून चार शब्द प्रेमाने बोलावे बस इतकचं हवा असता तिला बाकी काही नाही.....
पण हे सगळ इतरांना कटकट वाटते.... त्यांना हे काळात नाही... कि तिला हवा आहे फक्त एक प्रीतीचा आधार....
आणि म्हणून मग तिला आठवत आपला माहेर... जिथे असतात आई बाबा काळजी घेणारे... आपण उशिरा आलो तर , रोज च उशिरा येतेस किवा उशिरा का आलीस.. हे न विचारता किती उशीर झाला बस मिळाली होती का... गाडीत जागा मिळाली होती का... कि उभीच आली हे विचारणारे...
बहिण असते मस्ती करणारी वेळ प्रसंगी आनंदाने मदत करणारी... ज्या नात्यांमध्ये नसतात कसलेही हेवे देवे.....आणि मग म्हणव लागत... गेले ते दिवस....
No comments:
Post a Comment