माझी देवाची संकल्पना: भाग 2
पाठील पान तर तुम्ही वाचलंच, आपण त्यात दोन वर्ग पाहिलेत ते म्हणजे आस्तिक आणि नास्तिक. तर मित्र मैत्रिणिनो, नास्तीकांबद्दल तर मी गेल्या भागात च लिहिला.. पण हा जो आस्तिक वर्ग आहे ना वो भी
काम नाही हे... दुध से धुला हुवा नाही हे.. त्यात हि बरेच प्रकार आहेत..
आता आस्तिक असणं म्हणजे काही फक्त देवासमोर बसून मंत्र पूजा करणं नव्हे.. पण बऱ्याच जवळ जवळ ९०% लोकांनी ह्यालाच आस्तिक पणाची व्याख्या करून टाकलेला आहे.. म्हणजे कसा देवासमोर बसून मंत्र पूजा म्हटलं कि झाला ह्यांनी पुण्य कमवलं मग बाकी काही हि करायला ते मोकळे...
एक उदाहरण देते.... एखादी व्यक्ती सुसंस्कृत घरातली खूप पूजा पाठ करते... मंत्र, श्लोक, पूजा पाठ, साधना अगदी सर्व काही वेळच्या वेळी, चांगल चांगल वाचन केला जाता सुविचार सांगणारं, चांगले चांगले कार्यक्रम पहिले जातात चांगली कर्म करा सांगणारी.. गुरु केले जातात, गुरुचे फोटो लावले जातात, प्रार्थना केली जाते... अगदी सगळ सगळ साग्रसंगीत पणे केला जाता..
पण हे सगळ करत असताना खरच किती जण हा विचार करतात, किती जण शांत चित्ताने बसून आपल्या मनाला विचारतात कि,
" खरच मी ईश्वराने दाखवलेल्या मार्गावर जात आहे का?,
खरच मी सद्गुरूने जो मार्ग दाखवला आहे त्यावर चालत आहे का?
खरच मी माझ्या वागण्याने मुद्दाम कोणाला दुखावत तर नाही आहे ना?
खऱ्या खुऱ्या अर्थाने मी ईश्वरभक्ती, सत्कर्म करत आहे का?"
खूप च कमी लोकं हि प्रश्न स्वतःला विचारात असणार, हे आज लोकांच्या वागण्यावरून च कळत.
अरे हि साधी गोष्ट ह्या लोकांना कळत नाही कि, ज्या ईश्वराला प्रस्सन करण्यासाठी आपण पूजा, पाठ, मंत्र, होम, हवन करत आहोत तो तुमच्यावर प्रस्सन होईल तरी कसा.. जर तुम्ही त्याने सांगितलेली वाट च सोडून चालू लागलात तर.. फक्त आपली काम व्हावी, आपल्याला मुक्ती मिळावी, चांगली नोकरी लागावी, सगळ नीट व्हावा म्हणून त्याला वर वर पूजा करून प्रस्सन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहणं
म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे...
त्यापेक्षा खऱ्या अर्थाने उघड डोळ्यांनी देवाची संकल्पना समजून घेतली तर.. माणसाला खऱ्या अर्थाने देव मिळू शकतो हि साधी गोष्ट आहे.. आणि ह्या साठी काही खास करण्याची गरज नाही.. ईश्वराचे वास्तव्य हे आपल्या आत्म्यात आहे तेव्हा हा आत्मा शुद्ध ठेवला, विचार शुद्ध ठेवलेत कि सगळच कसं छान होणार.
हा जन्म आपल्याला एकदाच मिळाला आहे तर त्यात जितका चांगल करता येईल तितका चांगला करून देवाजवळ जाण्याचा मार्ग मोकळा करता येतो.. हे ह्यासाठी सांगते कारण बऱ्याच लोकांचा मत असता कि
"आयुष्य एकदाच मिळाला आहे मज्जा मस्ती आता नाही करणार तर केव्हा करणार आपण" तर हे म्हणन योग्य आहे पण त्या मजा मस्तीला हि काही मर्यादा असल्या काही तत्व असले तर आपण खऱ्या अर्थाने आयुष्याचा आनंद घेऊ शकतो.. आयुष्याच्या शेवटच्या स्क्षणी आपण समाधानाने डोळे मिटू शकतो..
मनावर कसला हि ओझं ना ठेवता आपण ह्या जगाचा निरोप घेऊ शकतो.. आणि एवढा जरी आपल्याला जमला तरी.. आपण ईश्वराला मिळवला च म्हणून समजा..